Curatorial note:
Gallery Text- Lamps Gallery
तमसो मा ज्योतीर्गमय
अंधाराचे भय घालवून मानवी जीवन सुखकर करण्यात प्रकाशाचे स्थान अमूल्य आहे. प्रकाशाला अस्तित्व देणाऱ्या दिव्याचे स्थान आपल्या संस्कृतींमध्ये महत्वाचे आहे.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक महत्वाच्या घटनेत दिव्यांच्या समावेश आढळतो.
दिव्यांची दोन अंगे आहेत; एक तर तो प्रकाश देतो आणि दुसरे म्हणजे विविध धार्मिक, सांस्कृतिक समारंभाचा तो अविभाज्य घटक आहे.
बौद्ध तत्वज्ञानात ‘अत्त दीप भव’ म्हणजेच
“स्वतःच स्वतःचा दिवा बना – स्वयंप्रकाशी व्हा”
असे सांगितले आहे.
भारतीय संस्कृतीमधील दिव्यांची वाटचाल आणि नवीन तंत्रज्ञानामुळे दिव्यांच्या रूपात झालेले बदल याप्रदर्शनाचा विषय आहे.
आमच्या संग्रहातील वस्तूंमधून, गुहेत राहणाऱ्या आदिमानवाच्या मशालीपासून आजच्या एल इ डी पर्यंत दिव्यांचा प्रवास मांडलेला आहे.
यातून आपल्याला या दीपावली उत्सवात नवीन प्रेरणा व आनंद मिळेल अशी आशा आहे.
Oh Hidden Light …
shining in every creature !