Home » Events » G. A. Kulkarni
Loading Events

Curatorial Note:

जीएंची चित्र-किमया

” एके काळी मी वॉटर कलर मध्ये चित्र काढत असे.

नंतर मी ऑइल कडे वळलो आणि हे इंटरेस्ट बरेच दिवस टिकले.

ऑइल ना एक प्रकारचे वजन असते. वास्तवतेचे जास्त स्थैर्य असते.

( हे जरी असले तरी) मी ऑइल ची निवड केली तें माध्यम जास्त सोपे असते म्हणून. ते रंग वाळल्यावर त्यावर पुन्हा रंग थापटून हवा तो परिणाम आणण्याचा पुन्हा प्रयत्न करता येतो.

खऱ्या जलरंगात रंगाचा स्पर्श झाला कि संपले, तो बदलता येत नाही!”

शंकर रामाणींना लिहिलेल्या पत्रातून

‘अभिव्यक्तीच्या झगड्यातून जीए चित्रकला माध्यमाकडे वळले असावेत- ‘ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी

ज्या पद्धतीने गायकाला स्वर दिसतात तसेच जी.एंना रंग ऐकू येत असावेत. जीएंच्या चित्रकलेचा आस्वाद घ्यायवयाचा झाल्यास त्यांच्या साहित्यिक प्रतिमांचा आढावा आपणास घ्यावा लागेल. जी.एं.च्या मनात बहुदा अभिव्यक्तीचा झगडा सुरु असावा म्हणून ते कदाचीत या माध्यमाकडे वळाले असतील, असे मत प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले की, अभिव्यक्तीसाठीचे अजून एक माध्यम म्हणून जी.ए. चित्रकलेकडे वळले असावे. त्यांचा अबोल स्वभाव लक्षात घेता त्यांना चित्र का काढावशी वाटली हा त्यांच्या साहित्या इतकचा गूढ प्रश्न रसिकांना पडलेला आहे. बेळगाव मधील छोट्याशा घरात त्यांनी त्यांची ही चित्रकलेची कला जोपासली.

जीएंच्या चित्र रंगवण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास दिसतो. ब्रशच्या फटकाऱ्याची भीती नाहीच. जणू काही मागच्या जन्मी त्यांचं हे सगळं करून झालंय. रंग देखील अगदी डोळ्यात भरणारे. कधी गुलाबी, लाल, केशरी तर कधी सोनेरी पिवळा. त्यांच्या लेखनातील गूढता त्यांनी रंगवलेल्या चित्रातही उतरलेली दिसते.

श्रीराम हसबनीस

चित्रकलेचा प्रवास साहित्यिक प्रवासा सारखा

जी.एं.चा चित्रकलेचा प्रवास हा त्यांच्या साहित्यिक प्रवासा एवढाच खडतर होता. अभिव्यक्त होण्यासाठी जी.एं. सारखा साहित्यिक शब्द हे माध्यम असतांना चित्रकला या दुस-या अभिव्यक्तिच्या माध्यमाकडे का वळला असेल, हे गुढ आहे. जी.एं.ची अभिव्यक्ती उत्तुंग होती. कदाचीत काही भावना व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत असतील म्हणून जी.ए. चित्रकलेकडे वळले असतील. मात्र, जी.ए. चित्रकले पेक्षा शब्द या माध्यमात अधिक रमले.

अजित गाडगीळ म्हणाले की, जी.एं.च्या चित्रातून गूढमय रम्यता प्रदर्शित होते. त्यांच्या लेखणीची जशी वेगळी शैली होती तशी वेगळी आणि हटके चित्रकला शैली त्यांच्या चित्रातून दिसून येते. चित्रकला हा जी.एं.च्या व्यक्तीत्वाचा दुसरा पैलू होता.

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी उर्फ “‘जी.ए.'”(जन्म : १० जुलै १९२३; – ११ डिसेंबर १९८७) हे मराठी लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म ३० जुलै १९२३ की २ मार्च १९२२?, रोजी झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य धारवाड येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये ते इंग्लिशचे प्राध्यापक होते. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जातात. त्यांचे निधन ११ डिसेंबर १९८७ रोजी झाले.

त्यांना आपले आयुष्य खाजगी ठेवण्याचा ध्यास असला तरी, आपल्या आवडीनिवडी सामायिक असलेल्या आपल्या मित्रांपर्यंत पत्राद्वारे पोहोचण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्रांचे चार खंड प्रकाशित झाले. त्यातली बरीच पत्रे त्यांनी श्री पु भागवत, सुनीता देशपांडे, माधव आचवळ, जयवंत दळवी, अनंतराव कुलकर्णी, म दा हातकणंगलेकर यांना लिहिली होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखिका आणि पु. ल. देशपांडे याच्या पत्नी सुनिता देशपांडे आणि प्रा. जी. ए. कुलकर्णी यांची साहित्यिक मैत्री प्रगाढ होती. त्या मैत्रीसंबंधी ‘आहे मनोहर तरी’ या सुनिताबाईंच्या आत्मचरित्रात उल्लेख सापडतात.

Share This Story, Choose Your Platform!

Title

Go to Top