Home » Events » लिपी, शाई अन् मानव / Script, Ink & Humans
Loading Events

संवाद हा संजीवांमधला सर्वांत महत्वाचा गुणविशेष आहे. संवादाच्या इतर सर्व शैलीमध्ये लिखाण हे फक्त महत्वाचे माध्यम ठरले नाही तर ते सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक ही बनले. सुरुवातीला मुख्यतः नामकरण आणि मोजमाप इतकाच वापर असलेल्या लिखाणपद्धतीमध्ये मानवाने त्याच्या गरजा आणि आकांक्षेनुसार बदल केले आणि तिला समृद्ध बनविले. यातून कला आणि तंत्रज्ञान यांमधील परस्परसंबंधांच्या मार्गाचा शोध घेत शिलालेख ते डिजिटल इंटरफेसपर्यंत लिखाणाच्या साधनांची उत्क्रांती दिसून येते. या प्रदर्शनात संवादाच्या उत्पत्तीपासून ते डिजिटल काळापर्यंत झालेल्या उत्क्रांतीचा शोध घेत असताना, लिखाण हे व्यक्त होण्याचे एक विलक्षण स्वरूप आहे या अनुषंगाने त्याचे महत्त्व जाणून घेते.

आजपर्यंतच्या इतिहासात दौत, पेन आणि पेन स्टँड सारख्या दैनंदिन जीवनातील लिखाणाच्या साधनांवर सांस्कृतीक प्रभाव पडलेला आहे. लिखाणाच्या विविध साधानांवरील रचना आणि मोटीफ्समध्ये दिसणारे मार्मिक, तसेच विशेष सांस्कृतीक संवाद या प्रदर्शनातून मांडले आहेत. रोज वापरातील वस्तूंवरचा बहुसांस्कृतिक प्रभाव मांडण्याचा यातून प्रयत्न केला आहे.

 

Communication is one of the most primitive aspects of living beings. Amongst all other forms of communication, writing not only became one of the important ones but also served as a symbol of social status. From its first uses of naming and counting, humans have altered and enriched writing to reflect their complicated needs and desires. It traces the interrelations of art and technology, showcasing the evolution of writing tools, from stone to digital interfaces. Exploring the evolution of communication, this exhibition delves into the significance of writing as a unique form of expression.

Throughout history, writing tools has absorbed cultural influences, evident in daily objects like ink pots, pens, and pen stands. The exhibition showcases the subtle yet significant cultural interactions that are reflected in the designs and motifs present in various writing tools. It attempts to reveal the subtle seepages of multicultural impact in these daily life objects, blurring the lines of origin culture.

Share This Story, Choose Your Platform!

Title

Go to Top