Curatorial note:
पुण्याला समृद्ध कलात्मक वारसा आहे. ज्याची सुरवात जेम्स वेल्स आणि गंगाराम तांबट यांच्यासारख्या उल्लेखनीय कलाकारांपासून होते. त्यांनी शनिवार वाड्यातील आर्ट स्कूलमध्ये आपले कौशल्य विकसित केले. कालांतराने, समकालीन जगाच्या गरजा आणि त्याच्या सामाजिक-आर्थिक संदर्भांनुसार वैविध्यपूर्ण कलात्मक प्रकारांचा उदय झाला. चित्रशाळा प्रेसने विविध तंत्राचा वापर करून अधिकाधिक विषयांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करून पुण्याचे कलात्मक परिदृश्य अधिक समृद्ध केले. प्रतिभावान चित्रकार आणि सुलेखनकारांच्या पिढीचे पालनपोषण करून पुण्याच्या कलासृष्टीला आकार देण्यात प्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटिश अकादमी शैलीत प्रशिक्षित जे. डी. गोंधळेकर आणि जी. डी. देउस्कर यांसारख्या नामवंत कलाकारांनी शहराच्या कलाविश्वामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. गोंधळेकर, कला इतिहास आणि प्रिंटमेकिंगच्या तंत्रावरील अभ्यास जगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, यांनी पुण्याच्या कलात्मक विकासावर प्रभाव पाडला आणि अनेक उद्यमुख कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत बनले. याशिवाय, दादा केळकरांच्या केळकर चित्रशाळेची निर्मिती ही नवोदित कलाकारांसाठी एक केंद्रबिंदू बनली, ज्यामुळे पुण्याच्या समृद्ध कला समुदायामध्ये विविध कलात्मक क्षेत्रांचा विकास झाला. पुण्याच्या सांस्कृतिक दृश्याला समृद्ध करत, विजय शिंदे आणि दिलीप चित्रे या कलाकारांनी शहराची कलात्मक क्षितिजे विस्तारत, आधुनिकतावादी तंत्रे सादर केली. अमर चित्र कथा यांसारख्या लोकप्रिय कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारी प्रताप मुळीक यांची चित्रे आणि स्टुडिओ पॉटरीमध्ये निर्मला पटवर्धन यांचे नाविन्यपूर्ण योगदान, पुण्यातील गतिमान कलात्मक लँडस्केप दाखवतात. डब्ल्यू. एन. भट यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या फोटोग्राफिक पोर्ट्रेटने, फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी फोटोग्राफी स्कूलची स्थापना करून, पुण्याच्या समृद्ध छायाचित्रण वारशास मोठा हातभार लावला. अभिनव कला महाविद्यालयाचे संस्थापक नारायण पुरम आणि गणपती सजावटीचे प्रणेते खटावकर सर यांसारख्या दूरदृष्टीच्या कलाकारांमुळे पुण्याचे कलात्मक वातावरण अधिक समृद्ध झाले.
या प्रदर्शनांच्या मालिकेतून या कलाकारांचा आजपर्यंतचा चिरस्थायी वारसा साजरा करूयात. पहिले प्रदर्शन चित्रशाळा प्रेसवर केंद्रित आहे. त्यानंतरच्या प्रदर्शनांमध्ये ज्या समकालीन कलाकारांनी हा समृद्ध वारसा पुढे नेला त्यांच्यावर प्रकाश टाकण्यात येईल.
क्युरेटर – राजू सुतार
Pune’s artistic legacy can be traced back to its recent history, starting with notable figures like James Wales and his proteges, including Gangaram Tambat, who received training at the inaugural art school in Shaniwar Wada. From then, a wide variety of artistic forms evolved, influenced by the demands of the modern world and its socioeconomic backgrounds. The establishment of the Chitrashala press further enriched Pune’s artistic landscape, disseminating diverse subjects through various techniques to the masses. Notably, the press fostered a lineage of illustrators and calligraphers, profoundly influencing Pune’s art scene. Prominent artists such as J. D. Gondhalekar and G. D. Deuskar, who were trained in the British academic style, played a vital role in shaping the art world of the city. Gondhalekar, a renowned figure in the world of art history and understanding of printmaking, has greatly influenced Pune’s artistic development, serving as a source of inspiration for countless aspiring artists. In addition, the establishment of Kelkar Chitrashala by Dada Kelkar became a central point for emerging artists, giving rise to various artistic disciplines within Pune’s vibrant art community. Adding depth to Pune’s cultural landscape, artists like Vijay Shinde and Dilip Chitre brought forth innovative modernist techniques, broadening the artistic spectrum of the city. Pratap Mulik’s illustrations, notably in comic books such as Amar Chitra Katha, and Nirmala Patwardhan’s groundbreaking work in studio pottery, highlight the vibrant artistic scene in Pune. W. N. Bhat’s photographic portraits of influential figures, combined with his establishment of a photography school at Fergusson College, greatly contributed to Pune’s rich photographic heritage. Pune’s artistic milieu was further enriched by visionaries like Narayan Puram, founder of Abhinav Kala Mahavidyalaya and Khatavkar Sir, who pioneered Ganpati decoration.
This series of exhibitions seeks to interconnect these pivotal moments, celebrating the enduring legacy of these artists to the present day. The inaugural exhibition spotlights the Chitra Shala press, with subsequent exhibitions honoring all pillars of Pune’s artistic heritage, culminating in contemporary artists who carry forward this rich legacy.
Curator- Raju Sutar