Curatorial Note:
Black on White
The Story of Ink on Paper…
Since the dawn of history,
the desire to put a mark on the world,
might have started with footprints in earth
and scribbling in sand, to carving wood, stone or metals.
The journey to record & communicate, found two pathways :
One of signs & symbols leading to words & language;
Second of Images as drawings & paintings.
This exhibit, presents a journey from recent past,
Of Prints in Maharashtra.
In a larger context,
We try to show the evolution of human expression,
in different mediums and spaces;
We hope you find it enjoyable.
In connecting the dots… in this world of images.
What started with a dot, a flow of dots…
creating lines.. & forms
symbols…letters… words…
is the story of articulation..
while sharing experiences & stories..
Explore this journey of the dot.. in the two dimensional space.
In German artist, Paul Klee’s words :
“A line is a dot that went for a walk.”
कागदावरच्या छपाईचा इतिहास जरी अनेक शतके जुना असला तरी जर्मनी मध्ये जोहान गटेनबर्ग ( १४५०) शोध लावलेल्या छपाई यंत्रापासून व्यवसायिकरित्या छपाईची सुरुवात झाली असे म्हणता येईल. त्याआधी कलात्मक छपाईसाठी इन्ग्रॅव्हिन्ग, इचिंग, वूड ब्लॉक प्रिंटिंग अश्या अनेक पद्धतींचा वापर केला जाई.
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात देव देवतांचीहि विविधता आहे. नित्य दर्शन, पूजनासाठी मंदिरात, घराच्या भिंतींवर तसेच धार्मिक ग्रंथांमधून देवतांचे आणि पौराणीक प्रसंगांचे चित्रण केलेले असायचे.
१९ व्या शतकात ब्रिटिश साम्राज्याबरोबर आलेल्या नवनवीन तंत्र ज्ञानाचा वापर चित्रकारांनी देव देवता आणि पौराणीक प्रसंगांचे चित्रण करण्यासाठी वापरायला सुरुवात केली. हे तंत्र होते लिथोग्राफिक प्रिंटिंग अर्थात देशी भाषेत ज्याला शिळा प्रेस म्हणत ते होय. या तंत्रामध्ये दगडाच्या पृष्ठ भागावर विशिष्ट पदधतीने चित्रण करून त्या पासून छपाई करीत. भारतामध्ये सर्वप्रथम कलकत्ता येथे १८७०-८० च्या सुमारास या तंत्राचा वापर करून धार्मिक प्रिंट्स बनवले गेले.
याच सुमारास महाराष्ट्रात सुद्धा चित्रप्रियप्रकाश प्रेस मध्ये अश्या प्रकारचे प्रिंट्स तयार होऊ लागले. तर १८७८ मध्ये पुण्यात चित्रशाळा प्रेसची सुरुवात झाली. विष्णू कृष्ण चिपळूणकर आणि त्यांच्या दोन भागीदारांनी मिळून हा प्रेस सुरु केला होता. लवकरच या उद्योगाची उलाढाल सर्व भारतभर होऊ लागली आणि काही परदेशी छापखान्यांनी या संधीचा फायदा घ्यायचे ठरवून इंग्लंड, जर्मनी तसेच इटली मधून भारतीय बाजारात प्रिंट पाठवायला सुरुवात केली. या सर्वाचा उत्कर्ष काळ सुरु झाला तो थोर चित्रकार राजा रवि वर्मा यांनी मुंबई मध्ये आपला छापखाना सुरु केल्यावर. रवि वर्मा प्रेस नंतर वासुदेव पंड्या, इंद्र शर्मा असे अनेक चित्रकार या क्षेत्रात पुढे आले. कॅलेंडर आर्ट हा प्रकार लोकप्रिय झाला.
याच बरोबर विविध जाहिराती, वेष्टने यावरही आकर्षक छपाई होऊ लागली, आणि त्यामुळे एक प्रकारे कला जनसामान्यांपर्यंत पोहोचली.
_____
महाराष्ट्रात मुद्रणाची सुरुवात एकप्रकारे सांगली सरकारी छापखान्यापासून झाली असे म्हणता येईल. तत्कालीन सांगलीचे पहिले श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीत १८२२ ला शिळा प्रेस उभारली. या मध्ये प्रामुख्याने सणवार, व्रत वैकलये अशा विषयांचा समावेश आहे. चातुर्मासाची गोपद्मे, नागपंचमीला पुजला जाणारा जिवतीची कागद, वट पौर्णिमा तसेच १८४६ सालचे पंचांग यांचा समावेश आहे. त्यावेळी याबाबतची बातमी हॉलंडमधील एका वर्तमानपत्रात छापून आली होती.
त्यानंतर १८७० पासून लिथोग्राफी अर्थात शिळाप्रेस तंत्राने मुद्रण होऊ लागले. मुंबईतील चित्रप्रकाश प्रेस, आर्यभूषण प्रेस येथुं विविध धार्मिक ग्रंथांनी चित्रांची छपाई होऊ लागली. तर १८७८ मध्ये पुण्यात चित्रशाळा प्रेसची सुरुवात झाली. विष्णू कृष्ण चिपळूणकर आणि त्यांच्या दोन भागीदारांनी मिळून हा प्रेस सुरु केला होता. मुख्यतः धार्मिक आणि पौराणिक विषयांवरील प्रिंट्स हे त्यांचे वैशिष्ठय होते. त्याच बरोबर भारतातील ऐतिहासिक व्यक्तीं आणि घटनेची चित्र, शैक्षणिक तक्ते आणि खेळाचे पत्ते हि तिथे छापले जात असत. सन १८८९ मध्ये पुण्याच्या चित्रशाळा प्रेसचे मॅनेजर व्ही. जी. जोशी यांनी रवि वर्माला पुण्यात आमंत्रित केले होते आणि ‘भारतातील शूर वीर आणि महनीय व्यक्तींची चित्र’ छापण्याविषयी सुचवले होते. त्यातूनच पुढे रवि वर्मा यांना स्वतःचा छापखाना सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.
लवकरच या उद्योगाची उलाढाल सर्व भारतभर होऊ लागली आणि काही परदेशी छापखान्यांनी या संधीचा फायदा घ्यायचे ठरवून इंग्लंड, जर्मनी तसेच इटली मधून भारतीय बाजारात प्रिंट पाठवायला सुरुवात केली. त्यांच्या छपाईचा दर्जा जरी चांगला असला तरी त्या चित्रकारांना भारतीय विषयांची ओळख नसल्याने ती चित्र कलात्मक दर्जा गाठू शकली नाहीत.