नव्या पिढीचे नाटक म्हणून सांगता यावे असे हे वेगळे बालनाट्य हायजॅक! हे नाटक आपल्याला फोनच्या आतलं जग सुंदर आहे का बाहेरचं असा विचार करायला लावते. ह्या नाटकातील ‘नीलू’ नावाचं पात्र आई, बाबा, मित्र- मैत्रिणी, शिक्षक ह्यांच्या सूचनांना वैतागून फोनच्या आत जाते. तिथे मात्र तिला काही गोष्टींना सामोरे जावे लागते, काही गोष्टी शांतपणे समजून घेऊन तर काही गोष्टींचा विचार करून सोडवाव्या लागतात, नीलू या गोष्टी सोडवू शकेल ?
खरंच फोन आपल्याला हायजॅक करतो की आपण फोनला ? हे जाणून घेण्यासाठी आवर्जून पाहायला येणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच जवळचा विषय ‘हायजॅक’!
लेखक आणि दिग्दर्शक – अनमोल देशपांडे, वैदेही गोडबोले
प्रकाशयोजना – श्याम चव्हाण, निखिल मारणे, चेतन ढवळे
संगीत – अवधूत धायगुडे, अनमोल देशपांडे, वैदेही गोडबोले
बालकलाकार:
इरा जोशी, मिहिका जोशी, ईशाना जोशी, सान्वी गांधी, मन्वी लहुरीकर, अनुश्री हर्डीकर, ईशा चितळे, देवश्री केंगार