ब्राह्मण युनिटी सारेगम, स्वरालंकार प्रस्तुत, सावन बरसे तरसे दिल…
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असे म्हणत पावसात भिजत भिजत पावसाची आठवणीतील गाणी म्हणायची आणि ऐकायची मजा काही निराळीच हो ना! चला तर मग आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला
जशी पावसाची रूपे अनेक तशी या गाण्यांची देखील…काही अल्लड, अवखळ, काही धुंद प्रेमगीते…तर बरेचदा विरहगीते पण…पाऊस प्रत्येकालाच एक वेगळी हुरहूर लावतोच…
तर अशा पावसात मनोमन भिजत भिजत पावसाची आठवणीतील गाणी म्हणायची मजा काही निराळीच हो ना!
त्याच आठवणीना उजाळा देण्यासाठी ब्राह्मण युनिटी सा रे गा मा तर्फे स्वरालंकार चे गायक घेऊन आले आहेत हिंदी मराठी गीतांचा सुरेल नजराणा….
“सावन बरसे तरसे दिल…”
Artist: मिलिंद राजूरकर, तनुजा राजूरकर, धीरेश शास्त्री, विवेक औरंगाबादकर, श्वेता शेनोलीकर, जान्हवी गोखले, अरविंद फाटक , स्वानंद दिवशीकर, नितीन कुलकर्णी, सरिता लिमये, अनुजा गाडे, मंदार वाळिंबे