राम पर्व – एक ध्यास… एक प्रवास
नव्या रचना, नवा अंदाज
या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग २४ एप्रिल २०२४ रोजी भरत नाट्य मंदीर, पुणे येथे यशस्वी पार पडला आणि श्रोत्यांनी तोंड भरून कौतुक सुद्धा केलं.
राम पर्व चा दुसरा प्रयोग ८ जून २०२४ रोजी विठ्ठलराव सातव सभागृह, सहकार नगर येथे तर तिसरा प्रयोग १३ जुलै २०२४ रोजी सरदार वासूदेव बळवंत नातू सभागृह येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, या कार्यक्रमाचे प्रयोग सातत्यानं करत राहणं आणि त्रेता युगात घडलेलं रामायण नव्यानं लोकांसमोर मांडत राहणं असा आमचा हेतू आहे.
Artists –
- संकल्पना/गीतकार/निवेदक: पार्थ (अमित गोखले)
- संगीतकार/गायक: हेमंत आठवले
- संगीतकार/गायिका: सौ. जान्हवी गोखले
- संगीत संयोजन/संवादिनी: सौ. शुभदा आठवले
- तबला: केदार तळणीकर
- ताल-वाद्य: अवधूत धायगुडे
- व्हायोलिन: वेधा पोळ