Home » Events » पिंपळपान – आठवणीतील गाणी
Loading Events

आपल्या आत मध्ये खोलवर रुजून बसलेली काही सुमधुर मराठी गीते तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न. सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके आणि प्रेमकवी मंगेश पाडगावकर यांच्या रचनांचा हा सुमधुर कार्यक्रम सोबत सुसज्ज वाद्य वृंद आणि कार्यक्रमाला साजेसे निवेदन. अनेक वर्ष मराठी, हिंदी गीतांचे कार्यक्रम करणारे , झी सारेगमप विजेते गायक अरविंद फाटक यांच्या संकल्पनेतून साकारलेला अविस्मरणीय कार्यक्रम. रसिकाच्या पसंतीला उतरलेला भाव गीतांचा हा कार्यक्रम नुकताच बालशिक्षण सभागृह कोथरूड येथे पार पडला.  त्याची काही क्षणचित्रे फोटो आपल्यासाठी पाठवीत आहे.

 

“पिंपळपान – आठवणीतील गाणी..”

अनेक वर्ष रेडिओच्या, दूरदर्शनच्या माध्यमातून आपण ही गाणी ऐकत आहोत. आजही ती गाणी आपल्या मनाला साद घालतात, रुंजी घालतात आणि दोन क्षण, विसाव्याचे आपल्या ओंजळीत येतात. कुठेतरी हरवलेली पायवाट पुन्हा एकदा सापडते आणि या गाण्यांच्या साथीने आपण पुन्हा एकदा इतिहासात रममाण होतो. काही गाणी हरवलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा आपल्याला जोडून देतात, जीवन कसे जगावे याचा संदेश देतात. इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये, मनाला उल्हसित करणारी ही गाणी आपल्याला निश्चित आवडतील.

  

Artists –

  • निर्मिती संकल्पना : अरविंद फाटक,
  • निवेदन : सुनिता पागे,
  • गायक कलाकार : प्रणिता पेठे, आदिती गोगटे , आणि अरविंद फाटक,
  • वादक कलाकार : ओंकार पाटणकर , अमित कुंटे ,अतुल गर्दे

Share This Story, Choose Your Platform!

Title

Go to Top