डॉक्टर संगीता बर्वे यांच्या *झिपरू या कादंबरीवर आधारित झिपरू हे बालनाट्य आहे.
नाट्य रूपांतर, नेपथ्य आणि दिग्दर्शन: शेखर नाईक
संगीत: उदय रामदास
गायक: प्रांजली बर्वे, हृदया दातार, शर्व दाते आणि सानिका आपटे
वेशभूषा: गायत्री चक्रदेव
प्रकाश योजना: अबोली शितोळे
कलाकार: शर्व दाते, श्रिया जोशी, श्रुति जोशी, सन्मित्र जोशी, वेद पुरोहित, कियान बोरकर, अथर्व बागडी, ईश्वरी जाधव, हृदया दातार.
जंगलातून सर्कस मध्ये पळवून आणलेल्या एका अस्वलाची ही कथा आहे. झिपरू या अस्वलाच्या आई वडिलांना मारून त्याला सर्कस मालकाने पळवून आणलेले असते. सर्कस मधील ज्युली ही गावातील लहान मुलांच्या मदतीने या अस्वलाची सर्कस मधून सुटका करते. प्राण्यांनाही आपल्याप्रमाणे मन असते, भावना असतात. अस्वलाच्या व्यथेतून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.