महाकवी कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा.शिरवाडकर. महाराष्ट्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित साहित्य यासारख्या विविध साहित्य प्रकरात चौफेर मुशाफिरी केली. प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिताही केली. अप्रतिम कल्पनाशक्ती, अलंकृत आणि पल्लेदार भाषाशैली ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कुसुमाग्रजांच्या काव्यात्मक प्रतिभेशी निगडित अशा नाटकांनीही त्यांना आजरामर केले आहे. असा पराकोटीचा अभिमान आणि कळवळा असणारा, मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणारा स्वर्गदारातील तारा म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या साहित्य खजिन्यातील काही अलंकार अभिवाचन, नाट्य, नृत्य, आणि संगीत या द्वारे रसिक-कलारंजन आपणा पुढे सादर करीत आहे…गगनीचा अढळ तारा
लेखन : अंजली दफ्तरदार
दिग्दर्शन : प्रसाद कुलकर्णी
गीत संयोजन : हर्षदा गोखले – ताम्हाणे
नृत्य दिग्दर्शन : सुचित्रा मेडदकर
संगीत साथ : जयंत कुलकर्णी, अभिजीत पाटसकर