Synopsis –
सुप्रसिद्ध संगीतकार व गाण्याचे समीक्षक श्री. कौशल इनामदार व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते सत्कार प्राप्त व शांतिदूत दलाई लामा यांची ह्रद्य दाद लाभलेल्या, सुप्रसिद्ध गायिका शुभांगी मुळे प्रस्तुत
‘गाण्याच्या पलिकडील रंगतरंग’
आम्ही घेऊन येत आहोत आणि सादर करणार आहोत आपल्या सर्वांच्या मना मनातील तरल, भावपूर्ण, धडाकेबाज हिंदी व मराठी गाणी व त्या गाण्यांची अनोखी, रंगतदार, नवी ओळख करून देणार आहेत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार.
कधी बेभान तालावर थिरकणारी गाणी, तर कधी पार्श्व गायकाच्या भावूक आवाजाने ओळखली जाणारी गाणी, कधी वाद्यवृंदाचा जल्लोषाने बागडणारी गाणी, तर कधी रम्य समुद्राच्या लाटांनी, सुंदर सुंदर फुलांनी प्रसन्न झालेली गाणी.
अशी ही लाजवाब गाणी आपल्या मना-मनातली.
आणि ह्या गाण्यांच्या आत्म्याला, हृदयाला स्पर्श करणारा आमचा अनोखा रंगतदार कार्यक्रम!
चला तर मग रंगुन जाऊया अशा या रंगीबेरंगी मोहक, सुंदर गाण्याच्या दुनियेत कौशल इनामदार सह!
‘कौशल रंग-तरंग’
Artists –
Main artists –
विशेष सहभाग – श्री.कौशल इनामदार,
सहभाग – गायिका शुभांगी मुळे व हेमंत वाळुंजकर
Co-artists –
सिंथेसायझर:- श्री.सुभाष देशपांडे,
हार्मोनियम:- श्री.जयंत साने,
तबला :- श्री.मोहन पारसनीस,
ताल वाद्य:- श्री.हेमंत पोटफोडे,
निवेदन:- नीना भेडसगावकर