‘आरव’,पुणे निर्मित ‘झिम्मड पाऊसगाणी’ सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. निखिल महामुनी हे यावेळी सादरीकरण करणार आहेत. त्यांना रेखा पाटणकर, अनुराधा गोगटे, ऋचा महामुनी, श्रीया महामुनी, सुशांत कुलकर्णी यांची गायन साथ असून, सौ.किरण पोतदार यांचे सूत्रसंचालन तर, विजय पाटणकर निवेदन करणार आहेत.
कार्यक्रमात पावसाच्या विविध छटा उलगडणारी गाणी सादर होणार आहेत. यामध्ये काही गाजलेली मराठी गाणी त्यासोबतच निखिल महामुनी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर होणार आहेत.